रफिक सूरज

रफिक सूरज हे समकालीन वर्तमानाचे विविध पैलू उत्कटतेने मांडणारे कवी-लेखक आहेत. सोंग घेऊन हा पोर हा कवितासंग्रह, रहबर ही कादंबरी, तसेच आभाळ, बेबस, पायाड असे कथासंग्रह आणि समीक्षात्मक लेखन यांद्वारे त्यांनी साहित्यविश्वात ठसा उमटवला आहे. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र शासनासह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यांचा आगामी कवितासंग्रह चिडीचूप्प वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा आहे.

रफिक सूरज यांची बेबस ही कथा एका कुटुंबाच्या आयुष्यापासून सुरू होत असली तरी तिचा आवाका संपूर्ण समाजाच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपर्यंत पोहोचतो. परिस्थितीच्या कचाट्यात अडकूनही सत्त्व आणि नैतिकता न सोडणाऱ्या माणसांचा शोध घेणारी ही कथा वाचकाला खोलवर स्पर्शून जाते.

Share the Post:

बेबस

‘बेबस’ – रफीक सूरज यांचा कथा संग्रह.
व्यक्तिगत आयुष्यापासून व्यापक सामाजिक प्रश्नांपर्यंत पोहोचणाऱ्या, जीवनमूल्यं आणि आत्मशोध अधोरेखित करणाऱ्या प्रभावी कथा.