आपले लेखक

मराठी साहित्य समृद्ध करणारे विचारवंत, कथाकार आणि अभ्यासक.

किरण गुरव हे मराठीतील प्रतितयश लेखक आहेत, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेला आहे. ‘राखीव सावल्यांचा खेळ’हा त्यांचा कथासंग्रह विशेष गाजलेला आहे. त्यांची जुगाड ही मराठीतील विशेष महत्त्वाची कादंबरी आहे.
1 पुस्तक
दि. बा. पाटील हे दक्षिण महाराष्ट्रातील साहित्य चळवळीतील खंबीर आवाज आहेत. त्यांच्या लेखणीत कृष्णाकाठची माती, सामान्य माणसाचे दु:ख आणि संघर्षाचे वास्तव जिवंत होते. रांगडी भाषा, धीरगंभीर शैली आणि थेट स्वभावशोध हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘नोटबंदी’ कथासंग्रहातून त्यांनी सामाजिक-आर्थिक बदलांचे प्रभावी चित्रण करत वर्तमानाचा आरसा वाचकांसमोर उभा केला आहे.
1 पुस्तक
प्रा. (डॉ.) नीला जोशी या मराठी साहित्य व लोकसाहित्याच्या जाणकार अभ्यासक आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अध्यापन, संशोधन व लेखन क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. ‘व्यक्तिमत्व विकास आणि भाषिक कौशल्ये’ या पुस्तकाच्या संपादक म्हणून त्यांनी भारतीय परंपरेतील ज्ञानी, कर्ता व कष्टकरी अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवले आहे.
1 पुस्तक
वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेले पांडुरंग पाटील उत्तम शेती करणारे शेतकरी लेखक आहेत. अल्प शिक्षित असूनही त्यांची भाषेवरील हुकूमत वाखाण्यासारखी आहे.बारमाही शेतीत राबणारा हा शेतकरी जसे शेतात उत्तम पीक काढतो, तशीच साहित्यातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची नांगरमुठी ही कांदबरी मराठीतील असाधारण कलाकृती आहे.
1 पुस्तक
बेबस ही कथा परिस्थितीच्या कचाट्यात अडकलेल्या माणसांचा शोध घेताना, त्यांच्या सत्त्व आणि नैतिकतेचा ठसा उमटवते. समाजाच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना भिडणारा हा लेखनप्रवास वाचकाला खोलवर विचार करायला लावतो.
1 पुस्तक
राजन गवस हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक असून त्यांच्या कळप कादंबरीत एका पिढीचे विस्कटलेले जगणे, सामाजिक वास्तव आणि हरवलेले मूल्य यांचे थेट व प्रखर चित्रण आहे. गवस यांची भाषा भिडणारी, शैली थेट आणि आशय वाचकाला विचार करायला भाग पाडणारा आहे.
1 पुस्तक
संतोष जगताप हे व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असून उत्तम कथा लेखक व कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तरूण शेतकऱ्यांची घुसमट चित्रित करणारी ‘विजेने चोरलेले दिवस ‘ ही त्यांची महत्वाची कांदबरी आहे ‘लोडशेडींग’ या विषयावरील ही एकमेव कांदबरी आहे.
1 पुस्तक

मराठी साहित्याचे अधिक आवाज शोधा.

नवीन लेखक, नवीन पुस्तके, नवीन विचार.